पुणे : हडपसरमध्ये शिवसेना जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार

मुंबई तक

कोयता गँगमुळे पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीची चर्चा सुरू असताना गोळीबाराची एक घटना समोर आलीये.

पुण्यात वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवसेना (UBT) अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयाबाहेर गोळीबार करण्यात आला.

पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकरण घडल्याचं सांगण्यात येत आहे.

स्वत:ला भाई म्हणवणार्‍याने हातात पिस्तुल घेऊन कार्यालयाच्या बाहेर हवेत गोळीबार केला.

मुख्य रस्त्यावर अतिक याने हातात पिस्तुल घेऊन ‘यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,’ अशी धमकी दिली.

नंतर पिस्तुलातून फायरिंग करुन दहशत निर्माण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.