'आधी थोबाडात देईन आणि नंतर...' चित्रा वाघांनी उर्फीला भरला दम

रोहित गोळे

सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारेच चाळे आम्ही चालू देणार नाही. असं म्हणत चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी जावेदला दमच भरलाय.

Instagram/chitrakwagh

'ही कोण बाई आहे सुद्धा मला माहीत नाही. एका 9 वर्षाच्या मुलीच्या आईने मला हिचा व्हिडिओ पाठवला'

Instagram/chitrakwagh

'तिने मला कळकळीने सांगितलं की, तुम्ही हे बघा.. तुम्ही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर जा.'

Instagram/chitrakwagh

'जेव्हा मी पाहिलं तिचं अकाउंट तेव्हा मी हैराण झाले. मुंबईतील रस्त्यांवर अशी उघडीनागडी स्ट्रिप बघून हैराण झाले.'

Instagram/urf7i

'व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांना लाज वाटत नाही? स्वैराचार माजवला आहे हा.'

Instagram/urf7i

'चार भिंतीच्या आत उघडे-नागडे नाचा, आम्हाला काही घेणं-देणं नाही.. पण सार्वजनिक ठिकाणी असं वागणार तर प्रसाद नक्की मिळेल.'

Instagram/chitrakwagh

'मला ज्या दिवशी ती हातात सापडेल त्या दिवशी पहिल्यांदा थोबडवेल आणि नंतर ट्विट करुन सांगेल मी काय केलंय ते.' असा दम चित्रा वाघांनी दिलाय.

Instagram/chitrakwagh