Republic Day: BSF च्या खास पथकात पहिल्यांदाच महिला!

मुंबई तक

यंदा 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

दिल्लीस्थित असणाऱ्या कर्तव्य पथावर फुल ड्रेसमध्ये परेडची रंगीत तालीम सुरू आहे.

-

यावेळी रंगीत तालमीत सीमा सुरक्षा दलाची म्हणजेच BSF चं उंटांचं खास पथक पाहायला मिळालं.

परेडमध्ये सहभागी होणारी बीएसएफच्या उंट पथकाची यावेळी झलक पाहायला मिळणार आहे.

कर्तव्य पथावरून जाणाऱ्या परेडमध्ये यावेळी पहिल्यांदाच महिलाही उंटांवरील जी खास फौज असते त्यात त्या सहभागी होणार आहेत.

परेडमध्ये रेल्वे संरक्षण दल म्हणजेच आरपीएफची तुकडीही सहभागी होणार आहे.

हवाई दलाच्या अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरनेही परेडसाठी रंगीत तालीम सुरु केली आहे.

लष्कराची शान असलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली आणि आकाश क्षेपणास्त्रही पाहायला मिळणार आहे.