फ्रान्सचा सायकलवीर शिवनेरीवर.... छत्रपतींच्या चरणी झाला नतमस्तक!

मुंबई तक

फ्रान्समध्ये विदेशी भाषांचा शिक्षक असलेला ३४ वर्षीय युवक अलेक्झांडर फिरीयानोव्ह सायकलवारी करत भारतातील लोकसंस्कृती अनुभवत आहे.

शिवजन्मभूमीतल्या सायकल प्रेमींनी त्याला खास मराठमोळी टोपी आणि शाल भेट देवून त्याचं स्वागत केलं. शिवाय नारायणगावची प्रसिध्द मिसळ सुद्धा खाऊ घातली.

अलेक्झांडर फिरीयानोव्ह महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गडकोट आणि सह्याद्रीला भेट देत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकून तो थेट किल्ले शिवनेरीवर आला आणि राजांच्या चरणी लिन झाला.

मुंबई ते कन्याकुमारी हे दिड हजार किमी पेक्षा जास्त अंतर पार करून तो भारताचा सायकलवारीने शोध घेत आहे.

भारतात येऊन येथील संस्कृती आणि लोकजीवनाचा अभ्यास करण्याची अलेक्झांडर फिरीयानोव्हची खूप दिवसांची इच्छा होती.