'हे' बॉलिवूड स्टार्स आहेत गणपती बाप्पाचे भक्त, दरवर्षी घरी करतात स्वागत...

मुंबई तक

अभिनेता सोनू सुदने दगडूशेठच्या रुपातील गणपतीची घरी स्थापना केली होती.

अभिनेता गोविंदा आणि त्याचे कुटुंबही गणपती बाप्पाचे भक्त आहेत.

संजय दत्त हा महादेवाचा खूप मोठा भक्त आहे. पण त्याची पत्नी मान्यता दत्त गणपतीला मानते.

हृतिक रोशनही बाप्पाची स्थापना करतो. त्यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब मिळून गणपतीची पूजा आणि सेवा करते.

अभिनेता शाहरुख खानही गणपतीचा मोठा भक्त आहे. तोही दरवर्षी घरी गणपतीची स्थापना करतो. यंदा शाहरुखने त्याचा लहान मुलगा अबरामचा गणपतीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीही गणपतीची भक्त आहे. प्रत्येक सुख-दुखात ती गणपतीची आराधना करत असते.