Ganesh Utsav 2022 : देवा श्रीगणेशा! लालबागच्या राजाचे खास फोटो

मुंबई तक

लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे

लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली

सर्व फोटो सौजन्य-राजू इनामदार आणि मंदार चव्हाण

१९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात `श्री'ची स्थापना झाली. येथूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली

लालबागच्या राजाच्या हातात चक्र आणि परशू आहे, तर पायाशी गदा ठेवली आहे. एक हात आशीर्वादासाठी पुढे केला आहे. या रूपात बाप्पा साजिरा दिसतो आहे

लालबागच्या राजाला यंदा राम मंदिराचा देखावा करण्यात आला आहे

गेल्या अनेक वर्षांपासून याच ठिकाणी लालबागचा राजाची स्थापना केली जाते

गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच ३१ ऑगस्टला बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल