भांडी, भाज्या आणि बरंच काही... बाप्पाची ही रुपं बघितलीत का?

मुंबई तक

विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाने सर्वत्र जल्लोष आणि भक्तीने भारावलेलं वातावरण आहे.

घरोघरी आणि जागोजागी बाप्पा विराजमान झालेला असून, बाप्पाच्या वेगवेगळ्या रुपातील मूर्ती बघायला मिळत आहेत.

पुण्यात एका कलाकाराने घरगुती वस्तुंपासून बाप्पाची रुपं साकारली आहेत. याविषयी कलाकाराचं कौतूक होतंय.

आपल्या ऐकून आश्चर्य होईल की पुण्यात एक असा कलाकार मूर्तिकार आहे, ज्याला लाडका बाप्पा आसपासच असावा असे जाणवते.

आपण वापरतो त्या रोजच्या वस्तुंमधेच बाप्पा कसा साकारता येईल, या विचारातून या कलाकाराने आकर्षक मूर्ती साकारल्या आहेत.

या कलाकाराने डोक्यात आलेली कल्पनेला मूर्त रूप देत घरातील वस्तूंच्या मदतीने बाप्पाच्या मूर्ती साकारल्या.

मुकुंद दातार असं या कलाकाराचं नाव असून, त्याने अभिनव कला विद्यालयातून कलेचे शिक्षण पूर्ण केलं आहे.

गेल्या 16 वर्षात मुकुंद दातारने बाप्पाला घरामधील भांडी, भाज्या, क्रोकरी, बांधकामास साहित्य, वाद्य, गाड्यांचे पार्टस्, खेळांचे साहित्य, गॅस-स्टोव्ह, सायकल, रंगाचे साहित्य, दिवे, वजनमापे अशा प्रकारच्या गोष्टींतून गणेशाची रूपे साकारली आहेत.

स्टील भांड्यांचा वापर करून साकारलेली गणपती बाप्पाची मूर्ती.

या वर्षी मुकुंदने प्लास्टिकच्या वस्तुंपासून बाप्पाला साकारला आहे.