Ganeshotsav 2022 : सारा अली खानने केली बाप्पाची पूजा; झाली ट्रोल

मुंबई तक

गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सगळीकडून कानावर पडत आहे. आनंदायी आणि जल्लोषपूर्ण वातावरण असून, बॉलिवूड सेलिब्रिटीही बाप्पाची सेवा करताना दिसत आहेत.

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खाननेही बाप्पाचं (Sara Ali Khan) स्वागत जल्लोषात स्वागत केलं.

सारा अली खानने गणरायासोबतचे फोटोही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत सारा अली खानची आई अमृता सिंगही दिसत आहे.

याच फोटोवरून नेटिझन्सनी सारा अली खानला ट्रोल केलं आहे.

सारा अली खानने गणेश चतुर्थीच्या दिवशीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.

सारा अली खानने फोटोसोबत कॅप्शन लिहिलं आहे. त्यामध्ये सारा म्हणते, 'गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.'

याच फोटोंवरून सारा अली खानला ट्रोलर्संनी लक्ष्य करत टीका केली आहे.

तुला लाज वाटली पाहिजे की मुस्लिम असूनही या गोष्टी करते, अशा आशयाच्या कमेंट्स यूजर्संनी केल्या आहेत.

पैशासाठी स्वतःचा धर्मही विकला, अशी कमेंटही एका यूजरने केली आहे. सारा अली खान ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिला वेगवेगळ्या कारणांवरून ट्रोल केलं गेलं आहे.

फोटोः सारा अली खान इन्स्टाग्राम