मुंबई तक
भारताला आज 'गंगा विलास क्रूझ'च्या रूपाने एक मोठी भेट मिळणार आहे.
पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझला व्हर्च्युअली हिरवा झेंडा दाखवतील.
या रिव्हर क्रूझमध्ये 31 प्रवासी आणि 40 क्रू मेंबर्स प्रवासी करतील.
रिव्हर क्रूझ वाराणसीवरून सुटेल आणि 51 दिवसांत 3,200 किमी अंतर पार करून आसाममधील दिब्रुगडला पोहोचेल.
'गंगा विलास क्रूझ'चा प्रवास वाराणसीतील काशीहून सुरू होत, पटना, कोलकाता, ढाकामार्गे दिब्रुगडला संपेल.
प्रवाशांच्या सुरक्षिततेची आणि सुविधेची काळजी घेत क्रूझमध्ये एकूण 18 कॅमेरे आहेत. तसेच, जीम, स्पा, लेक्चर हाउस, लायब्ररी याही सोयी आहेत.
एका 5 स्टार हॉटेलपेक्षाही भारी अशा सुखसोयींचे आयोजन क्रूझमध्ये करण्यात आले आहे.
भारताच्या जल परिवहनातील ही सर्वात लांब आणि जबरदस्त अशी रिव्हर क्रूझ आहे.
गंगा विलास भारतातील स्वदेशी निर्मित पहिली क्रूझशीप आहे.