मुंबई तक
एक वृद्ध महिला पहिल्यांदाच फ्लाईटमध्ये बसली, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
गंगवा असं या महिलेचं नाव असून त्या @GangavaMilkuri या युजरनेमने ट्विटरवर अॅक्टिव्ह आहेत.
महिलेने ट्विटर अकाऊंटवरून तिच्या पहिल्या हवाई प्रवासाचे फोटोही शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती निळ्या रंगाची साडी नेसून प्रवास करताना दिसत आहे.
फ्लाईटमधील प्रवासादरम्यान गंगवाच्या चेहऱ्यावर अनेक प्रकारचे भाव दिसले. कधी घाबरताना दिसली तर, कधी आनंदी दिसली.
गंगवा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहेत, ट्विटरवर त्यांचे 8 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
व्हिडीओमध्ये त्यांचा संपूर्ण विमान प्रवास अतिशय रंजक पद्धतीने रेकॉर्ड करण्यात आला आहे.