दोन महिलांबद्दल सांगताना गौतम अदाणींच्या डोळ्यात आलं पाणी

मुंबई तक

श्रीमंत व्यक्तीच्या यादीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उद्योगपती गौतम अदाणींनी एक किस्सा सांगितला.

हा किस्सा सांगताना गौतम अदाणींच्या डोळ्यात पाणी आलं.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदाणी यांनी दोन महिलांची गोष्ट सांगितली.

तुम्हाला प्रेरणा कुठून मिळते, या प्रश्नाचं उत्तर देताना गौतम अदाणींनी ही गोष्ट सांगितली.

अरुणिमा सिन्हा आणि किरण कनौजिया यांचं नाव घेतलं.

दोन्ही महिलांनी पाय गमावूनही जग जिंकलं असं गौतम अदाणी हे मुलाखतीत म्हणाले.

अरुणिमा यांनी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केलंय, तर किरण यांनी ब्लॅड रनर, मॅरेथानमध्ये भाग घेतलाय.

या दोन्ही महिलांची गोष्ट सांगताना गौतम अदाणी यांचे डोळे पाणावले.