रोहित गोळे
चीनची आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक Geely ने आपल्या देशांतर्गत बाजारात नवीन मिनी इलेक्ट्रिक कार Geely Panda लाँच केली आहे.
अतिशय आकर्षक लूक आणि डिझाईन असलेल्या या कारमध्ये चार जण बसू शकतात.
या छोट्या मिनी इलेक्ट्रिक कारची लांबी फक्त 3,065 मिमी आहे.
याशिवाय प्रचंड ट्रॅफिक असलेल्या शहरांमध्येही ही कार सहज चालवता येईल. ती Tata Nano पेक्षाही लहान आहे.
याची किंमत 40 हजार ते 50 हजार युआन आहे, जी भारतीय चलनात सुमारे 5 लाख रुपये आहे.
या कारचे एकूण वजन 797 किलो आहे आणि तिचा टॉप स्पीड 100 किमी प्रतितास आहे.