Maltese : डॉक्टरांना जर्मनीवरुन मुंबईत बोलवून कुत्र्यांची ओपन हार्ट सर्जरी

मुस्तफा शेख

कुत्रा, मांजर अशा पाळीव प्राण्यांवर लोकं जीवापाड प्रेम करत असतात.

या प्राणांना काही दुखलं-खुपलं तर त्यांच्यासाठी वैद्यकीय उपचारही करतात.

त्याचप्रमाणे मुंबईतील एका कुटुंबाने आपल्या पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलली आणि तेही वाचलं.

या लहान कुत्र्यावर नुकतीच ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. या कुत्राला जीवघेणा हृदयविकाराचा त्रास होता.

पण आता गुंतागुंतीच्या ऑपरेशननंतर कुत्र्याला नवीन जीवन देण्यात आले आहे.

माल्टीज जातीच्या कुत्र्यावर शस्त्रक्रियेसाठी जर्मनीहून डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते.