India's Expensive houses: भारतात फक्त अंबानींचं नाही तर, यांची सुद्धा घरं...

मुंबई तक

जगभरात अब्जाधीशांच्या गणनेत भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात सध्या श्रीमंतांची संख्या वाढतेय.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने याबाबत एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, भारतात अब्जाधीशांची संख्या 177 आहे.

अब्जाधीशांची ओळख ही त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीतून होते. या संपत्तीत त्यांची आलिशान घरंही असतात.

भारतात ज्यावेळी अब्जाधीशांचे नाव घेतले जाते त्यावेळी अंबांनी कुटुंबाची आठवण होते.

रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी मुंबईतील पेडर रोड परिसरात राहतात. त्यांच्या अँटेलिया बंगल्याची नेहमीच चर्चा होते.

मुकेश अंबानींच्या 27 मजली अँटेलियाची किंमत ही तब्बल 12,000 कोटी रूपये आहे.

परंतु, भारतात अंबानींशिवाय असे इतरही अब्जाधीश आहेत ज्यांची आलिशान आणि महागडी घरं आहेत.

भारतातील दुसरं महागडं घर हे गौतम सिंघानिया यांचं JK House आहे. याची किंमत 6,000 कोटी रूपये आहे.

तिसऱ्या क्रमांकाचं घर हे अनिल अंबांनींचं आहे. पाली हील येथील 17 मजली त्यांची Abode बिल्डिंग आहे. ज्याची किंमत 5,000 कोटी आहे.

देशातील चौथ्या क्रमांकाचं महागडं घर हे सायरस पूनावालांचे आहे. त्यांच्या घराचे नाव लिनकॉन हाऊस आहे.

महागड्या घरांमध्ये कुमार मंगलम यांचे 5व्या क्रमांकाचे जटिया हाऊस आहे.

उद्योगपती रतन टाटांचे 300 कोटींचे Retirement Home सहाव्या क्रमांकावर आहे.

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याचे 200 कोटींचे घर सातव्या क्रमांकावर आहे.

उद्योगपती सज्जन जिंदल यांचे 150 कोटींचे जिंदल हाऊस देशात आठव्या क्रमांकावर आहे.

देशात नवव्या क्रमांकावर बॉलिवूडच्या बिग बींचा जलसा बंगला आहे. त्याची किंमत 120 कोटी रूपये आहे.

तसेच, एस्सार ग्रुपचे रवि रूइया आणि शशी रूइया यांचे रूइया हाऊसही महागड्या घरांच्या यादीत आहे.