Twitter blue tic : पैसे देऊन अशी मिळवा 'ब्ल्यू टिक'

मुंबई तक

एलन मस्क हे जेंव्हापासून ट्विटरचे सीईओ झाल्यापासून त्यांनी अनेक बदल केले आहेत

ट्विटर ब्ल्यू ही नवीन पेड सुविधा ट्विटरने सुरु केली आहे.

याचं सब्सक्रिप्शन भारतात देखील घेतलं जाऊ शकतं. यासाठी तुम्हाला 8 डॉलर खर्च करावे लागतील.

ट्विटर ब्ल्यू सबस्क्रिप्शन अधिकृतपणे भारतात लाँच केलेले नाही. पण, अनेक जण त्याचे सबस्क्रिप्शन घेत आहेत. कसं ते जाणून घेऊया.

यासाठी, तुम्ही आधी तुमच्या फोनवर Apple App Store किंवा Google Play Store वरून VPN अॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे.

एकदा अॅप डाउनलोड झाल्यानंतर, तुमचा सर्व्हर यूएसशी कनेक्ट करा. यानंतर, Google Chrome मध्ये Twitter वेबपेज उघडा. ट्विटर ब्लू ओपन केल्यानंतर तुम्हाला पर्यायांमध्ये ट्विटर ब्लूचा पर्यायही दिसेल.

त्यावर क्लिक केल्याने तुम्हाला पेमेंट पेजवर नेले जाईल. जिथे तुम्ही पैसे देऊन ट्विटर ब्लू टिक मिळवू शकता. यासोबत तुम्हाला अनेक अतिरिक्त फीचर्स देखील मिळतील. म्हणजेच ट्विटर ब्लूचे सर्व फिचर्स तुम्ही वापरू शकता.