Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाचा 'हा' क्रिकेटर भारताचा जावई

मुंबई तक

टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरूद्धचा पहिला वनडे सामना 5 विकेट राखून जिंकलाय.

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल या मालिकेत खेळत आहे.

ग्लेन मॅक्सवेल भारताचा जावई आहे. त्याने भारतीय वंशाच्या वीना रमन सोबत लग्न केले आहे.

तमिळ कुटूंबातील असलेल्या वीना रमनने मार्च 2022मध्ये मॅक्सवेल सोबत लग्न केलं.

ग्लेन मॅक्सवेल आणि वीना रमनने अनेक वर्ष एकमेंकाना डेट केलं. 5 वर्ष रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न केलं.

वीना रमनचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आहे. मात्र त्यांचे कुटूंब तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये राहते.

वीना रमन एक फार्मासिस्ट आहे. मेलबर्न सेकेंडरी गर्ल्स कॉलेजमधून तिने मेडिकल साईन्सची डिग्री केली आहे.