मुंबई तक
जर तुम्हाला गोव्याची फेणी महानगरांच्या विमानतळावर घ्यायची असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.
आता देशातील सर्व महानगरांच्या विमानतळावर गोव्याचा ब्रँड असलेली काजू फेणी हे करमुक्त स्वरूपात मिळणार आहे.
यासाठी आता गोवा सरकारने निश्चित केलेली आणि छापील किंमतच मोजावी लागणार आहे.
गोव्याच्या फेणीला जागतिक स्तरावर बाजारपेठ प्राप्त व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हा गोवन ब्रँड करमुक्त करत असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.
मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई यासारख्या महानगरांच्या सर्वच विमानतळावर उपलब्ध असेल.
या सर्व ठिकाणी गोव्याची फेणी करमुक्त किंमतीच खरेदी करता येणार आहे.
गोवा सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे काजू फेणीच्या चाहत्यांना आता विमानतळावर फेणीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार नाहीत.