भारतीय महिला क्रिकेट संघासाठी गुडन्यूज; थेट T20 वर्ल्ड कपमध्ये एंट्री

मुंबई तक

भारतीय महिला क्रिकेट संघाने यावेळी टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती.

ऑस्ट्रेलियाला हरवून टीम इंडियाला विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नसले तरी उपांत्य फेरी गाठण्याचा फायदा मात्र झाला आहे. 2024 साली बांगलादेशमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाला थेट प्रवेश मिळाला आहे.

विश्वचषक 2023 गटातील अव्वल 6 संघांना आगामी विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळतो.भारतीय संघ टॉप-3 मध्ये होते.

दोन्ही गटातील टॉप-6 संघांसह बांगलादेश आणि पाकिस्तानला यजमान राष्ट्र म्हणून पुढील विश्वचषकात प्रवेश मिळाला आहे.

विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेला गट-1 मधून प्रवेश मिळाला आहे.

तर इंग्लंड, भारत, वेस्ट इंडिज यांना गट-2 मधून प्रवेश मिळाला आहे.

आता T20 विश्वचषक 2024 साठी ICC द्वारे क्वालिफायर्स आयोजित केले जातील, ज्यामधून 2 संघ निवडले जातील.