PPF आणि SSY मध्ये पैसे टाकणाऱ्यांना झटका, कुणाला होणार फायदा?

मुंबई तक

पोस्ट ऑफिससह काही बचत योजनांवरील व्याजदरात केंद्र सरकारने वाढ केलीये.

NSC, पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट, ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांच्या व्याजदरात वाढ केलीये.

या बचत योजनांवर सुधारित व्याजदर 1 जानेवारीपासून लागू होणार आहे.

पब्लिक प्रोव्हिडंड फंड योजनेवरील व्याजदरात कोणतेही बदल झालेले नाही.

सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात जानेवारी ते मार्च या तिमाहीत कोणतेही बदल केलेले नाहीत.

सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के व्याजदर कायम राहणार आहे.

पब्लिक प्रोव्हिडंड फंडवरही 7.1 व्याजदर मिळणार आहे. तर पोस्ट ऑफिसच्या 1 ते 5 वर्ष कालावधीतील डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ झालीये.

RBI ने घेतला मोठा निर्णय | (प्रातिनिधिक फोटो)

मंथली इन्कम स्कीम आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदरातही वाढ झालीये.