हार्दिक पंड्याला आला अर्शदीप सिंगचा राग; म्हणाला, 'त्याने गुन्हाच केलाय'

मुंबई तक

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी 7 नो बॉल टाकले.

नो बॉल बद्दलची नाराजी हार्दिक पंड्या लपवता आली नाही आणि तो बोलून गेला.

पंड्या म्हणाला, "टी20 मध्ये पावरप्ले महत्त्वाचा असतो."

"या सामन्यात पावरप्ले दरम्यान गोलंदाजी आणि फलंदाजीत खराब कामगिरी झाली."

"मी अर्शदीपला दोष देत नाहीये, पण आम्हाला मूळ गोष्टींवर लक्ष द्याव लागेल," असं हार्दिक म्हणाला.

"अर्शदीपने गोलंदाजी करताना काही नो बॉल टाकले."

हा एक प्रकारे गुन्हाच आहे, जो त्याने केला. असं व्हायला नको", असं हार्दिक म्हणाला.