सलमान खानसोबत कधी भांडण झालंय का? बॉडीगार्ड शेराने काय दिलं उत्तर?

मुंबई तक

सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा यांच्यातील बॉडिंग सगळ्यांनाच माहिती आहे.

शेरा अनेक वर्षांपासून सलमान खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करतो. तो खान कुटुंबाचाच भाग आहे.

सलमान खान कुठेही गेला तरी शेरा त्याच्यासोबत सावलीसारखा दिसतो.

त्यामुळे कायम सोबत राहणाऱ्या सलमान शेरामध्ये कधी भांडण झालं असेल का? याचं उत्तर शेराने दिलं.

सलमान खानसोबत कधी वाद झाले का? असं त्याला विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला, 'माझी स्वतःची काही तत्त्वं आहेत. त्या तत्त्वांपासून मी कधीच फारकत घेतली नाही.'

पुढे शेरा म्हणाला, 'मी सलमान भाईसोबत असताना कधीही मर्यादा ओलांडल्या नाहीत.'

यापूर्वी एका मुलाखतीत शेरा म्हणाला होता, 'मालक म्हणजे गुरु. सलमान खान माझं सर्वस्व आहे.'

शेराने यावेळी असंही म्हटलं, 'मी सलमान खानचे नेहमी रक्षण करेल आणि त्याचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही.'

शेरा केवळ सलमान खानचं संरक्षण करत नाही तर प्रत्येक सुख-दु:खातही तो त्याच्यासोबत दिसतो.

शेरा 1995 पासून सलमानसोबत आहे. 'जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी सलमान भाईसोबत राहणार,' असं शेरा म्हणतो.