Radhika Merchant: अंबानींच्या सुनेचा वेस्टर्न लूक पाहिलात का?

मुंबई तक

उद्योगपती मुकेश अंबानींची होणारी धाकटी सून राधिका मर्चंट नुकतीच एका कॉन्सर्टमध्ये दिसली.

अमेरिकन सिंगलर जॉन लेजेंडचं हे म्यूझिक कॉन्सर्ट होतं. तिने तिच्या मैत्रिणींसोबत ते एन्जॉय केलं.

या कॉन्सर्टमधील राधिका मर्चंटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

राधिकाचा सिंपल लूक चाहत्यांना भाळतो. तिच्या सिंपल आणि सोबर लुकमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसलाच्या नुकत्याच झालेल्या पार्टीत राधिकाचा किलर लूक पाहायला मिळाला.

गुलाबी रंगाची साडी त्यावर कोर्सेट ब्लाउज परिधान केलेली राधिका ही मनमोहक दिसत होती.

मोकळे केस आणि लाइट मेकअपमध्ये राधिका मर्चंटचा लूक पाहाण्यासारखा आहे. ती खूपच सुंदर दिसते.