मुंबई तक
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा काही दिवसांपूर्वी 'रोका' श्रीनाथजी मंदिरात झाला होता.
यावेळी कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र उपस्थित होते.
अनंत आणि राधिका हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. यासोबतच राधिका ही अनंतची खूप दिवसांपासून गर्लफ्रेंड होती.
अनंत आणि राधिका अनेक कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकत्र दिसले आहेत.
राधिका आणि अनंतचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत होता, ज्यामध्ये दोघे जंगल सफारीच्या कपड्यांमध्ये दिसले होते.
ईशा अंबानीच्या लग्नातही दोघे मॅचिंग बेज आउटफिट्समध्ये दिसले होते.
रोका सोहळ्यासाठी राधिकाने सुंदर फुलांचा लेहेंगा परिधान केला होता. तर अनंतने निळ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता.
अनंत आणि राधिकाला एकत्र अनेतदा स्पॉट झाले आहेत. आता लवकरच ते बंधनात अडकणार आहे.