मुंबई तक
गुळाचा चहा प्रतिकारशक्ती तर वाढवतोच परंतु त्याचबरोबर वजन घटवण्यातही मदत करतो.
गुळाचा चहा बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आरोग्याच्या दृष्टीनेही गुणकारक असणारी ही पद्धत जाणून घ्या.
गुळाचा चहा बनवण्यासाठी सर्वात आधी एक भांडं घ्या त्यात 1 कप चहा बनवण्यासाठी पाणी घ्या.
पाणी उकळल्यानंतर चहा पावडर, 4 छोटी वेलची, अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाका.
यामध्ये आलं, 1 छोटा चमचा बडीशेप पावडर, 2 कप दूध टाकून उकळवा.
गॅस कमी आचेवर ठेऊन त्यामध्ये 3 चमचे किसलेला गूळ टाकून चांगली उकळी येऊ द्या.
अशाप्रकारे पौष्टिक असा गुळाचा चहा तयार आहे.