Tunisha Sharma चं दुसऱ्याच व्यक्तीसोबत अफेअर? कोर्टात वकिलांचा स्फोटक दावा

मुंबई तक

तुनिशानी आत्महत्या का केली याचा पोलीस तपास सुरू आहे.

तुनिशाच्या मृत्यूमागे कुठेतरी शीजान खानवर संशय व्यक्त होत होता. सध्या तो तुरूंगात आहे.

परंतु, तुनिशा प्रकरणात रोज काही ना काही नवं गुढ उकलतंय.

तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात आज मुंबई न्यायालयात सुनावणी झाली.

शीजानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तुनिशाच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती असल्याचं समोर आलं.

शीजानचे वकील शैलेंद्र शर्मा यांनी या प्रकरणात गंभीर दावा केलाय.

या मिस्ट्री बॉयचं नाव अली असं सांगण्यात आलय. अलीसोबतच्या मैत्रीबाबत तुनिशाच्या आईलाही माहित होतं.

शैलेंद्र शर्मांनी सांगितलं, 'ब्रेकअपनंतर तुनिशा टिंडर अॅपवर डेटिंग करत होती.'

'टिंडरवर तुनिशाची ओळख ही अली नावाच्या मुलाशी झाली. त्याच्यासोबत ती डेटवरही गेली होती.'

'तुनिशाचं 21 ते 23 डिसेंबरपर्यंत अलीशी फोनवर बोलणंही झालं होतं.'

'आत्महत्या करण्याच्या १५ मिनिट आधी ती त्याच्याशी व्हिडीओ कॉलवरही बोलली होती.'

शीजनच्या वकिलांनी केलेल्या गंभीर दाव्यांमुळे प्रकरणात नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे.