Heeraben Modi : जड अंतकरणाने मोदींनी आईला दिला अखेरचा निरोप

मुंबई तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं (30 डिसेंबर) उपचारादरम्यान निधन झालं.

हिराबेन मोदी यांच्यावर अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार सुरू होते.

हिराबेन मोदी यांच्या पार्थिवावर गांधींनगरमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटद्वारे जड अंतकरणाने भावना व्यक्त केल्या.

पंतप्रधान मोदींनी आई हिराबेन मोदी यांना भावूक मनाने अखेरचा निरोप दिला.

हिराबेन मोदी यांचं पार्थिव नरेंद्र मोदी यांचे छोटे भाऊ पंकज मोदी यांच्या घरी आणण्यात आलं होतं.

हिराबेन मोदी यांच्या अंत्यसंस्कारावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते.