मुंबई तक
महाराष्ट्रात सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून लोकांकडून पैसे उकळणाऱ्या एका ठगाला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली आहे.
या लोकांनी फसवणुकीचा नवा मार्ग शोधल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे या गँगने अनेकांची लाखोंची फसवणूक केली आहे.
हे लोक अशा लोकांना टार्गेट करायचे जे काही वस्तू ऑनलाइन ऑर्डर करायचे आणि त्यांचे पार्सल यायचे.
सीबीआय अधिकारी म्हणून हे लोक ग्राहकांना फोन करायचे. मग तुमच्या पार्सलमध्ये चरस, गांजा, हेरॉईन असे अमली पदार्थ सापडले आहेत असे म्हणायचे.
पैसे देऊन प्रकरण मिटवता येईल, असे त्यांना सांगण्यात यायचे. लोकांनी त्यांना खरा सीबीआय अधिकारी समजून पैसे द्यायचे.
मात्र फसवणूक झालेल्या महिलेने या लोकांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला. आपली 14 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला नाशिक येथून अटक केली. तर त्याचा दुसरा साथीदार दुबईत राहतो. पोलिसांनी आरोपींकडून 43 सिमकार्ड जप्त केले आहेत.
सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे. यासोबतच या टोळीशी संबंधित इतर लोकांचाही शोध घेतला जात आहे.