काँग्रेसने एका महिन्यात पूर्ण केलं सर्वात मोठं आश्वासन : मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई तक

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखबिंदर सिंग सुखू यांनी राज्यात जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री सुखबिंदर सिंग सुखू यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जुनी पेन्शन योजना (OPS) हा मोठा मुद्दा बनला होता.

राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यास जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना दिले होते.

हिमाचल प्रदेशमध्ये सुमारे 4 लाख सरकारी कर्मचारी आहेत, पेन्शनधारकांची संख्याही मोठी आहे.

जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारी कर्मचारी उपोषणाला बसले होते.