मुंबई तक
हॉकी विश्वचषक 2023 सुरू झाला असून ओडिशात ही स्पर्धा चालणार आहे.
हॉकी विश्वचषकच्या 17 दिवस चालणाऱ्या स्पर्धेत एकूण 16 देशांच्या सहभागासह 44 सामने खेळले जातील.
हॉकी विश्वचषकाचे सर्व सामने हे राउरकेला आणि भुवनेश्वरमध्ये 13 ते 29 जानेवारीपर्यंत असणार आहेत.
यावेळी उद्घाटन कार्यक्रमात ग्लॅमरचा तुफानी तडका पाहायला मिळाला.
यावेळी बॉलिवूड कलाकारांमध्ये दिशा पटानी आणि रणवीर सिंहप्रमाणे इतर कलाकारांचाही सहभाग होता.
ओडिशातील कटक येथील बाराबती स्टेडियममध्ये हा कार्यक्रम पार पडला.
अभिनेत्री दिशा पटानीने तिच्या ग्लॅमरस लूक आणि डान्स परफॉर्मन्सने चाहत्यांची मनं जिंकली.
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिशा ही खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती.
दिशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर भारतीय महिला हॉकी टीमसोबतचे काही व्हिडीओही शेअर केले आहेत.