शहाजीबापू पाटलांनी कसं केलं ९ किलो वजन कमी?

मुंबई तक

आमदार शहाजी पाटील यांनी तब्बल ८ दिवसांत ९ किलो वजन कमी केलं आहे. 

बंगळुरुतील श्री. श्री. रविशंकर यांच्या आश्रमात राहून पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करून आपलं ९ किलो वजन कमी केले आहे.

शहाजी पाटील आठ दिवस पहाटे पाच वाजता उठून दोन तास योगासन करत होते

याकाळात शहाजी पाटील उकडलेल्या पालेभाज्या आणि शाकाहारी सात्विक आहार घेत होते.

याशिवाय रोज संध्याकाळी मेडिटेशनचाही भाग होता. याच ध्यान, धारणा आणि व्यायाममुळे शहाजी पाटील यांचं वजन कमी झाले आहे.

२४ डिसेंबरपासून सुरु झालेला शहाजी पाटील यांचा हा वेटलाॅस कोर्स शनिवारी पूर्ण झाला.