किती रुपयात होतो आधार कार्डवरील नाव आणि पत्ता अपडेट?

रोहित गोळे

Aadhaar कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाइल नंबर आणि ईमेल अपडेट करता येतो.

आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख अपडेट करण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क आकारले जाते

बायोमेट्रिक अपडेटसाठी तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील.

देशातील कोणत्याही नागरिकाला आधार फक्त एकदाच जारी केला जातो.

आधार डेटामध्ये तुम्ही तुमचे नाव वारंवार बदलू शकत नाही.

तुम्ही आधारमध्ये तुमची जन्मतारीख फक्त एकदाच बदलू शकता.

नवीन नियमानुसार दर 10 वर्षांनी आधार अपडेट करावे लागणार आहे.

UIDAI नागरिकांना आधार जारी करण्याचे काम करते.

आधारशिवाय सरकारी योजनांचा लाभ घेताना अडचणी येऊ शकतात.