मुंबई तक
महिला T20विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपलं वचर्स्व सिद्ध केलं.
विजेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव होतोय.
बक्षिस रक्कम म्हणून ऑस्ट्रेलिया संघाला जवळजवळ 8.27 कोटी डॉलर मिळाले.
उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 4.14 कोटी रूपये बक्षिस रक्कम मिळाली.
उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या उर्वरित दोन संघांना 2.10 कोटी रूपये समान रक्कम मिळेल अशी तरतूद होती.
विषचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या भारतीय संघाला सुमारे 1.74 कोटी रूपये मिळाले.
भारताने ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने जिंकले होते. यासाठी भारतीय संघाला आणखी 52,500 डॉलर मिळाले.
अशाप्रकारे T20 विश्वचषकात भारताला एकूण 2.17 कोटी रूपये बक्षिस रक्कम मिळाली.
इतर सहा संघ जे उपांत्य फेरीत पोहोचू शकले नाहीत त्यांना ICC द्वारे 30 हजार डॉलर प्रत्येकी देण्यात आले.