खड्डा, वेग, डुलकी... ऋषभ पंतचा अपघात कशामुळे? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

मुंबई तक

टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झालाय.

सध्या ऋषभ पंतवर देहरादूनमधील उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताची वेगवेगळी कारण सांगितली जात आहेत.

ऋषभ पंतने कार चालवताना डुलकी लागल्यानं अपघात झाल्याचं म्हटलेलं आहे.

आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अपघाताचं वेगळं कारण सांगितलंय.

पुष्कर सिंह म्हणाले, 'रस्त्यात खड्डा आला. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंतच्या कारचा अपघात झाला.

पुष्कर सिंह धामी यांनी रविवारी रुग्णालयात जाऊन ऋषभ पंतची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी अपघाताच्या कारणाबद्दल सांगितलं.