प्रेग्नेंसीदरम्यान सेक्स किती सुरक्षित? अभिनेत्रीनं दिलं उत्तर अन्...

मुंबई तक

अभिनेत्री नेहा मर्दाने प्रेग्नेंसीच्या सामान्य समज आणि तथ्यांबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे.

उदाहरणार्थ, गरोदरपणात चहा/कॉफी पिऊ नये. दोन लोकांचं अन्न खावे.

प्रवास, व्यायाम करू नये. मॉर्निंग सिकनेस हा सामान्य आहे. सेक्स करू नये.

नेहा मर्दाने या सर्व समजांबाबत उत्तरं दिली आहेत. नेहाने हे सर्व काही खोटे आणि चुकीचे असल्याचे सांगितले आहे.

अभिनेत्री नेहा मर्दाने दावा केलाय की, कोणतीही गर्भवती महिला चहा किंवा कॉफी पिऊ शकते.

गरोदरपणात सेक्स केल्याने बाळाच्या जीवाला धोका असतो. ही गोष्ट देखील मिथक असल्याचे नेहाने सांगितलं आहे.

पण दुसरीकडे नेहाच्या या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका असा सल्ला काही यूजर्सनी दिला आहे.

यूजरने लिहिले - गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत सेक्स सुरक्षित नाही. जोपर्यंत अशा गोष्टींचं तुम्हाला ज्ञान नसेल तर त्या शेअर करू नका.

त्या व्यक्तीने असेही म्हटले आहे की,- हे मिथक नाही, तुम्हाला डॉक्टर जे सांगतात तसंच करा. यूजरने अभिनेत्रीला रिसर्च करण्याचाही सल्ला यावेळी दिला आहे.