JOB : कामाच्या ठिकाणी राग अनावर होतो? या टिप्सने करा कंट्रोल

मुंबई तक

ऑफिसमध्ये कामाच्या प्रेशरमध्ये आणि खराब वातावरणामुळे अनेकदा राग अनावर होतो, चिडचिडेपणा वाढतो.

त्यामुळे अनेकदा ऑफिसमध्ये वादावादीचे प्रसंग उभे राहतात. सहकाऱ्यांशी संबंध बिघडतात.

पण आज आम्ही तुम्हाला कामाच्या ठिकाणी राग कसा कंट्रोल करायचा याबाबत काही टिप्स देणार आहोत.

जेव्हाही कधी तुम्हाला राग येईल किंवा चिडचिड होतीय असं वाटेल तेव्हा काही वेळासाठी ब्रेक घ्या आणि शांतपणे बसण्याचा प्रयत्न करा. तात्काळ प्रतिक्रिया देऊ नका.

ऑफिसमध्ये कोणत्याही व्यक्तीशी रागाच्या भरात वाद घालू नका आणि घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.

राग आल्यास सहकाऱ्याला प्रतिक्रिया न देता आपल्या प्रिय व्यक्तीशी बोला. बोलल्यामुळे अनेकदा आपल्याला आपण केलेली चूक समजते.

डोकं शांत झाल्यानंतर न कळत झालेल्या चुकीबद्दल माफी मागा आणि ऑफिसमधील नाती खराब होणार नाहीत याची काळजी घ्या.

जर प्रत्युत्तर देण्याची गरज असेल तर रागात शब्दांवर मर्यादा ठेवा. विचार करुन शब्दांची निवड करा.

कामाच्या ठिकाणी भावनात्मक न होता काही गोष्टी स्विकारण्याचा आणि त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा.