मुंबई तक
फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म Dream11 ने एक अतिशय मनोरंजक अशी पॉलिसी तयार केली आहे.
या पॉलिसीनुसार सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना कामाशी संबंधित कोणतेही कॉल किंवा मेसेज करता येणार नाही.
जर सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या मागे काम करण्यासाठी कोणी तगादा लावला तर त्या व्यक्तीला मोठा दंड ठोठावला जाईल.
कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुट्या चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता याव्या यासाठी कंपनीने ही नवीन पॉलिसी आणली आहे.
Dream11 च्या 'अनप्लग पॉलिसी' अंतर्गत कर्मचारी आठवड्याभर सुट्टी घेऊ शकतात. ज्यामध्ये त्या कर्मचाऱ्याला कामाबाबत कॉल करता येणार नाही.
'अनप्लग' काळात जो कोणी कामाबाबत कर्मचाऱ्याशी संपर्क साधेल त्याला तब्बल एक लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल.
कंपनीने कोणत्याही कर्मचाऱ्यावर अवलंबून राहू नये यासाठी हे धोरण लागू केले आहे.
यामुळे ड्रीम 11 चे कर्मचारी आता अजिबात काळजी न करता आपली सुट्टी एन्जॉय करु शकतात.