Heart Health: वयाच्या तिशीत आलात? मग या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष

मुंबई तक

वयाच्या तिशीनंतर शरीरात अनेक बदल घडतात. यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

इतकंच नाही तर तिशीत आल्यावर हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही बऱ्याच प्रमाणात वाढतो.

अशावेळी शरीर फीट आणि निरोगी ठेवण्यासाठी नियमित डाएट आणि व्यायाम आवश्यक ठरतो.

वयाच्या तिशीनंतर पौष्टिक आणि संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे.

आहारात फायबर आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश कधीही दीर्घायुष्यासाठी चांगला ठरतो.

मीठ, साखर, तळेलेले पदार्थ, मांसाहार यांचं सेवन कमी करावं, तर मद्यपान नेहमी टाळावं.

हृदयविकाराच्या झटक्याचं सर्वात मोठं कारण हे धूम्रपान आहे. धूम्रपानामुळे रक्तदाबाची समस्या वाढते.

शारीरिक हालचाली न केल्यानंही हृदयविकाराचा धोका वाढतो, त्यामुळे नियमित व्यायाम केल्यानं वजन आणि रक्तदाब नियंत्रित ठेवता येऊ शकतो.

झोपेचे विकार जसं की, इंसोमनिया यामुळेही हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होते. म्हणून दररोज 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे.

तणावासारख्या इतर समस्यांमुळे शरीरातील हार्मोन्सवर त्याचा परिणाम होतो. यासाठी योगा, मेडिटेशन करायला हवं.