मुंबई तक
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कसोटी संघांची ताजी क्रमवारी जाहीर केली.
कसोटी संघांच्या क्रमवारीत भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकलं आहे.
आयसीसीच्या कसोटी रॅंकिंगमध्ये भारताचे 115 पॉईंट्स आहेत तर ऑस्ट्रेलियाचे 111 पॉईंट्स आहेत.
यापूर्वी आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्ये 116 पॉईंट्ससह ऑस्ट्रेलियाची टीम अव्वल होती.
तर, 115 पॉईंट्ससह टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर होती. मात्र, आता हे चित्र बदलेलं दिसत आहे.
भारतात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाने ही कामगिरी केली आहे.
फेब्रुवारीपासून टीम इंडिया, ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
Ind vs Australia ही मालिका फेब्रुवारी ते मार्च महिन्यात खेळवली जाणार आहे.