Rajat Patidar : श्रेयस अय्यरच्या जागेवर संधी मिळालेला रजत कोण?

मुंबई तक

न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरू होण्याआधीच श्रेयस अय्यर जायबंदी झाला.

आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत श्रेयस अय्यरच्या जागी नवा खेळाडू खेळणार आहे.

श्रेयसच्या जागी रजत पाटीदारचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

इंदूरचा 29 वर्षीय रजत पाटीदार मध्यप्रदेश संघाकडून खेळतो.

रजतने वयाच्या 8व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

स्वतःच्या आजोबांच्याच क्रिकेट अकॅडमित त्याने क्रिकेटचे धडे गिरवलेत.

रजतने ऑफ ब्रेक स्पिनर म्हणून करिअरची सुरुवात केली होती.

अंडर-15 नंतर रंजतने फलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं आणि तो उत्कृष्ट फलंदाज म्हणून पुढे आला.

रजत पाटीदारने 2015 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नंतर लिस्ट-ए करिअरलाही सुरूवात केली.

2021 मध्ये त्याला RCB कडून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली.

रजतने आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध नाबाद 112 धावा केल्या. त्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

यंदाही रजत पाटीदार आयपीएल 2023 मध्ये RCB सोबत खेळताना दिसणार आहे.