मुंबई तक
बेपत्ता स्वदिच्छा साने प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
बोईसरमधील स्वदिच्छा साने 14 महिन्यांपूर्वी बँडस्टँड येथून बेपत्ता झाली होती .
स्वदिच्छाचा शेवटचा सेल्फी हा बँडस्टँड येथील जीवरक्षक मिथू सिंह सोबत होता.
आता 14 महिन्यानंतर मिथू सिंहला पोलिसांनी हत्येच्या प्रकरणात अटक केलीये.
चौकशी करताना मिथू सिंहने स्वदिच्छाची हत्या केल्याची कबूली दिली आहे.
या प्रकरणात वांद्रे स्थानिक गुन्हे शाखा कक्ष 8 तपास करत आहेत.
दरम्यान, स्वदिच्छाच्या वडील मनीष सानेंनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मनीष साने म्हणाले, "14 महिन्यांपासून मिथू सिंह हाच आरोपी असल्याच सांगतोय, पण पोलिसांनी योग्य तपास का केला नाही?"
"जर मिथू सिंगने स्वदिच्छाची हत्या करून मृतदेह समुद्रात फेकला, तर तिचा मृतदेह का सापडत नाही?"
"तिच्याजवळचं सामान पोलिसांना अजून का मिळालं नाही?", असे प्रश्न मनीष साने यांनी उपस्थित केले आहेत.