मुंबई तक
भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना आज (18 जानेवारी) खेळला गेला.
शुभमन गिलने न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात जबरदस्त द्विशतक झळकावलं.
लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर सलग 3 षटकार खेचत 145 चेंडूत गिलने 200 धावा पूर्ण केल्या.
87 चेंडूत शतक पूर्ण केल्यानंतर पुढच्या 58 चेंडूत त्याने दुसरे शतक पूर्ण केलं.
149 चेंडूत 208 धावा काढून शुभमन गिल बाद झाला. त्याच्या या खेळीत 19 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता.
गिलने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पीसं काढतं अवघ्या 19व्या डावात द्विशतक झळकावले आहे.
आपल्या द्विशतकी खेळीसह शुभमन गिलने या सामन्यात त्याच्या १ हजार धावाही पूर्ण केल्या.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने २१ डावात हजार धावा पूर्ण केल्या होत्या. आता त्यालाही गिलने मागे टाकले.