Ind vs Sl: पहिल्याच ODI खेळीत कोहलीचा 'हा' तुफानी अंदाज पाहिलात का?

मुंबई तक

टीम इंडियाने भारत-श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून 2023 वर्षाची चांगली सुरुवात केली.

यावेळी कर्णधार रोहित शर्माच्या टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला.

गुवाहाटीच्या बरसापारा येथे झालेल्या पहिल्या ODI मध्ये 67 धावांनी टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली.

टीम इंडियाच्या या चमकदार कामगिरीत स्टार फलंदाज विराट कोहलीचा तुफानी अंदाज पुन्हा पाहायला मिळालाय.

श्रीलंकेविरुद्धच्या खेळीतून कोहलीने या विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दाखवून दिलंय.

तसेच कोहलीने आपल्या खेळीने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.

या पहिल्या वन-डेमध्ये विराट कोहलीने दोन जीवदानांचा फायदा घेत 113 धावांची खेळी खेळली.

यामुळे भारताला सहा विकेट्सवर 373 धावांची जबरदस्त बाजी मारता आली.

कोहलीने 87 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्याच्या कारकिर्दीतील हे 45 वे शतक आहे.

आतापर्यंत सचिन तेंडुलकरचे वनडेमधील 49 शतक हे सर्वोच्च आहे, आता कोहली लवकरच हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.