मुंबई तक
श्रीलंकेविरुद्धची टी20 मालिका टीम इंडियाने 2-1 अशा फरकाने जिंकली.
विराट कोहली, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमारसह यांच्यासह इतर खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारताने चांगली कामगिरी केलीये.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळाली आणि त्यांनी संधीचं सोनं केलं.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत 5 खेळाडूंनी खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन करत लक्ष वेधून घेतलं.
यात पहिला खेळाडू म्हणेज अक्षर पटेल. अक्षरने तीन सामन्यांत 117 धावा केल्या आणि 3 गडी बाद केले. त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं.
दुसरा सूर्यकुमार यादव. सूर्यकुमारने 3 सामन्यांत 85 च्या सरासरीने 170 धावा केल्या. सूर्याने एक अर्धशतक आणि 1 शतक झळकावलं.
जलदगती गोलंदाज उमरान मलिकने मालिकेत चांगली कामगिरी केली. उमरानने 7 गडी बाद केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शिवम मावीने 4 गडी बाद केले. तर दुसऱ्या सामन्यात फलंदाजीने लक्ष वेधून घेतलं.
कर्णधार हार्दिक पंड्यानेही 3 गडी बाद केले, तर 45 धावा केल्या. मात्र त्याने कर्णधार म्हणून अनेक निर्णय घेतले, ज्यामुळे संघाची कामगिरी चांगली झाली.