Ind Vs SL : भारताची एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी

मुंबई तक

श्रीलंकेविरुद्धची एकदिवसी मालिका भारतासाठी ऐतिहासिक ठरली.

all photos/bcci Twitter

तिसऱ्या सामन्यात भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवताना इतिहास घडवला.

भारताने 317 धावांनी विजय मिळवला. इतक्या फरकाने विजय मिळवणारा भारत पहिला देश ठरलाय.

यापूर्वी न्यूझीलंडच्या नावे हा विक्रम होता. न्यूझीलंडने आर्यलंडविरुद्ध 290 धावांनी विजय मिळवला होता.

यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाने 275 धावांनी अफगाणिस्तावर विजय मिळवला होता.

391 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 73 धावांत बाद झाला.