मुंबई तक
श्रीलंकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना भारताने 67 धावांनी जिंकला. मात्र या मॅचमधील रोहित शर्माच्या काही निर्णयांचं कोडं चाहत्यांना अखेरपर्यंत उलगडलं नाही.
भारताने पहिल्या सामन्यासाठी बांगलादेशविरूद्ध द्विशतक ठोकलेल्या इशान किशनला संधी दिलेली नाही.
त्याचप्रमाणे टी 20 स्टार सूर्यकुमार यादवलाही रोहित शर्माने संघात स्थान दिलं नाही.
या व्यतिरीक्त बांग्लादेश दौऱ्यावर चांगली कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवलाही स्थान न दिल्याने चाहते नाराज झाले.
वॉशिंग्टन सुंदरलाही रोहित शर्माने आज बेंचवर बसवलं.
तर त्याचवेळी मागील बऱ्याच सामन्यांमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या के.एल.राहुलला संघात स्थान दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.