मुंबई तक
सध्या सेलिब्रिटींच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. त्यांचे पार्टनर, वेडिंग डेस्टिनेशन आणि इतर सर्व हे चर्चेचा विषय बनलेत.
अक्षर पटेल टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर खेळाडू आहे. तो नेहमीच मैदानात चांगली कामगिरी करतो.
हाच टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आता लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अक्षर पटेलने सध्या न्यूझीलंड सीरीजमधून ब्रेक घेत खास लग्नासाठी सुट्टी घेतली आहे.
अक्षर पटेलच्या होणाऱ्या पत्नीचे नाव मेहा पटेल आहे. त्या दोघांचा साखरपुडा 2022 मध्येच झालाए.
मेहा पटेल ही एक न्यूट्रिशियनिस्ट आहे, ती सोशल मीडियावर नेहमी डाएट प्लॅन शेअर करते.
मेहा आणि अक्षर फार आधीपासून एकमेकांना ओळखतात. त्यांची पूर्वीपासूनची मैत्री आहे.
काही दिवसांपूर्वी मेहा आणि अक्षर सुट्ट्यांसाठी अमेरिकेलाही गेले होते.