Suryakumar Yadav: फिल्मी लव्ह स्टोरी! कशी झाली पहिली भेट, प्रेम आणि लग्न?

मुंबई तक

भारत श्रीलंका T20 मालिकेत भारताच्या विजयात मुंबईकर सूर्यकुमार यादवने मोलाचा वाटा उचलला.

सूर्यकुमारच्या फलंदाजीप्रमाणेच त्याची लव्ह स्टोरीही रंजक अशी आहे.

सूर्यकुमारच्या पत्नीचं नाव देविशा शेट्टी असं आहे.

सूर्यकुमार आणि देविशा मुंबईत एकाच कॉलेजमध्ये शिकले.

कॉलेजच्या एका कार्यक्रमादरम्यान सूर्यकुमारला देविशा आवडली.

एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे त्यांची मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले.

पुढे 2016 मध्ये सूर्यकुमार आणि देविशा शेट्टी यांनी लग्न केलं.

देविशाने तिच्या पाठीवर सूर्यकुमारच्या नावाचा एक टॅटूही काढलेला आहे.

देविशा इंस्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असते. ती सूर्यकुमारसोबतचे फोटो नेहमी शेअर करते.