Suryakuamar Yadav : इंजिनिअरच्या पोरानं मैदान मारलंय! कसा घडला सूर्यकुमार?

मुंबई तक

श्रीलंकेविरुद्धची टी20 मालिका भारताने दणक्यात जिंकली.

भारतीय संघाच्या विजयात मुंबईकर सूर्यकुमार यादवने मोलाचा वाटा उचलला.

अखेरच्या निर्णायक सामन्यात सूर्यकुमार यादवने 112 धावांची खेळी केली.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधलं सूर्यकुमार यादवचं हे तिसरं शतक होतं.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवने 2021 मध्ये पदार्पण केलं होतं.

32 वर्षीय सूर्यकुमार यादवचा जन्म 14 सप्टेंबर 1990 रोजी मुंबईत झाला.

जवळपास 10 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर त्याला टीम इंडियात पहिली संधी मिळाली.

सूर्यकुमारचे वडील अशोक यादव BARC मध्ये इंजिनीअर आहेत, तर आई गृहिणी आहे.

सूर्यकुमार यादवने १०व्या वर्षापासून मुंबईत क्रिकेट कॅम्पमध्ये जाऊन तयारी सुरू केली.

आजघडीला सूर्यकुमार यादव टी20 क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे.

सूर्यकुमारने 2016 साली लग्न केलं. त्याच्या पत्नीचं नाव देविशा शेट्टी असं आहे.