Team Indiaच्या स्टार क्रिकेटरनं केलं लग्न!

मुंबई तक

भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती विवाहबंधनात अडकली आहे.

भारतीय महिला टीममध्ये वेदा कृष्णमूर्ती ही स्टार फलंदाज म्हणून ओळखली जाते.

वेदाने कर्नाटकमधील प्रसिद्ध क्रिकेटपटू अर्जुन होयसलासोबत कोर्ट मॅरेज केले आहे.

वेदा आणि अर्जुनची लव्हस्टोरी गेल्या वर्षी चर्चेत आली होती, जेव्हा अर्जुनने वेदाला प्रपोज केले होते.

ज्यावेळी क्रिकेटपटू अर्जुन होयसलाने वेदाला प्रपोज केले होते त्यावेळी त्याने हा फोटो शेअर केला होता.

त्यावेळी अर्जुन होयसलाने फोटो शेअर करत म्हटलं होतं की, 'आणि हो ती हो म्हणाली.'

वेदाने आपल्या लग्नाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'मिस्टर आणि मिसेस!!! असं लिहिलं आहे.

भारतासाठी 30 वर्षीय वेदाने 48 वन-डे आणि 76 टी-20 सामने खेळले आहेत.

तर, अर्जुन होयसला कर्नाटकसाठी क्रिकेट खेळतो.