INS Vagir : नौदलाची ताकद वाढली! कलवरी श्रेणीची 5वी पाणबुडी सैन्यात दाखल

मुंबई तक

सोमवारी (23 जानेवारी) कलवरी श्रेणीतील 5वी पाणबुडी वागीर (INS Vagir) भारतीय नौदलात दाखल झाली.

आयएनएस वागीरची बांधणी मुंबईतील माझगाव डॉकयार्डमध्ये फ्रान्सच्या मेसर्स नेवल ग्रुपच्या मदतीने करण्यात आली.

कलवरी श्रेणीतील वागीर पाणबुडी पाचव्या क्रमांकाची आहे. यापूर्वीच्या 4 पाणबुड्या नौदलात सेवेत आहेत.

नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार यांच्या हस्ते वागीर पाणबुडी नौदलाच्या सेवेत दाखल झाली.

1973 साली वागीर पाणबुडी नौदलात सामील झाली होती. 30 वर्ष सेवा केल्यानंतर 2001 मध्ये ती निवृत्त झाली.

निवृत्त झालेल्या आयएनएस वागीर पाणबुडीचे नाव नव्या पाणबुडीला देण्यात आले.

दोन वर्षांच्या सागरी चाचण्यानंतर भारतीय नौदलात वागीर पाणबुडीला सामील करण्यात आलं आहे.

आयएनएस वागीर सामील झाल्यामुळे नौदलाची मारक क्षमता आणखी वाढणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानासह स्वदेशी बनावटीची ही पाणबुडी संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने मोठे पाऊल आहे.